रेल्वेत 11,127 असिस्टंट लोको पायलट पदांची मेगाभरती; RRB मुंबईत 1,193 जागा

रेल्वे मध्ये ६२३८ टेक्निशियन पदांची मेगा भरती; RRB अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
 रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स (RRB) मार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या तब्बल 11,127 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये ही भरती होणार असून RRB मुंबईअंतर्गत 1,193 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 जून 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
RRB मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वेच्या 1,078, वेस्टर्न रेल्वेच्या 37 आणि दक्षिण सेंट्रल रेल्वेच्या 78 अशा एकूण 1,193 जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-2 वेतनश्रेणीनुसार मूळ वेतन 19,900 रुपये मिळणार असून विविध भत्त्यांसह अंदाजे मासिक वेतन 38 हजार रुपये राहील. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हे वेतन 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दहावी उत्तीर्ण व संबंधित तांत्रिक ट्रेडमधील आयटीआय/नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल व संबंधित शाखेतील डिप्लोमा अथवा पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
उमेदवारांची निवड CBT-1, CBT-2, कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट (CBAT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असून राखीव प्रवर्गांना नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. खुला, इमाव व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 500 रुपये, तर महिला, अनुसूचित जाती-जमाती, माजी सैनिक, दिव्यांग आणि इतर पात्र प्रवर्गांसाठी 250 रुपये ठेवण्यात आले आहे. उमेदवारांनी RRB च्या (http://www.rrbmumbai.gov.in RRB बेंगलुरू http://www.rrbbnc.gov.in RRB अहमदाबाद http://www.rrbahmedabad.gov.in) rrbapply.gov.in ) अधिकृत संकेतस्थळाद्वारे अथवा अर्ज पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावेत.