
PEN न्यूज ऑनलाइन टीम |
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती बोर्डांद्वारे (RRBs) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) अंतर्गत एकूण ५,८१० पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डांमध्ये ही भरती होत असून, RRB मुंबईत ५९६ आणि RRB अहमदाबादमध्ये ७९ पदे उपलब्ध आहेत.
रिक्त पदांचा तपशील
1️⃣ चिफ कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर – १६१ पदे
2️⃣ स्टेशन मास्टर – ६१५ पदे
3️⃣ गुड्स ट्रेन मॅनेजर – ३,४१६ पदे
4️⃣ ज्युनियर अकाऊंट्स असिस्टंट कम टायपिस्ट – ९२१ पदे
5️⃣ सिनियर क्लर्क कम टायपिस्ट – ६३८ पदे
6️⃣ ट्रॅफिक असिस्टंट – ५९ पदे
पात्रता
-
सर्व पदांसाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
-
टायपिस्ट पदांसाठी (क्र. ४ व ५) हिंदी/इंग्रजी टायपिंग प्रोफिशियन्सी अनिवार्य.
-
वयमर्यादा (१ जानेवारी २०२६ रोजी) १८ ते ३३ वर्षे.
-
राखीव प्रवर्गानुसार नियमानुसार वयोमर्यादेत सूट.
वेतन श्रेणी
-
पद क्र. १ व २ – पे लेव्हल ६ (₹३५,४००/-), अंदाजे वेतन ₹६८,०००/-
-
पद क्र. ३ ते ५ – पे लेव्हल ५ (₹२९,२००/-), अंदाजे वेतन ₹५७,०००/-
-
पद क्र. ६ – पे लेव्हल ४, अंदाजे वेतन ₹५२,०००/-
निवड प्रक्रिया
1️⃣ स्टेज-१ CBT – १०० गुणांची परीक्षा (GA, Maths, Reasoning)
2️⃣ स्टेज-२ CBT – १२० गुणांची परीक्षा
3️⃣ CBAT (अप्टिट्यूड टेस्ट) – स्टेशन मास्टर/ट्रॅफिक असिस्टंटसाठी
4️⃣ CBTST (टायपिंग टेस्ट) – टायपिस्ट पदांसाठी
5️⃣ दस्तावेज पडताळणी व वैद्यकीय तपासणी
परीक्षा शुल्क
-
सामान्य उमेदवार: ₹५०० (CBT दिल्यानंतर ₹४०० परत)
-
अजा/अज/महिला/अपंग/माजी सैनिक/अल्पसंख्यांक: ₹२५०
ऑनलाईन अर्ज
मुंबई RRB मधील पदांसाठी अर्ज
🔗 www.rrbmumbai.gov.in
अंतिम तारीख: २० नोव्हेंबर २०२५ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
📞 संपर्क: ०२२-६७६४४०३३