पुणे नाशिक मराठवाड्यातून पंढरपूरला “आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला” जाणाऱ्या. पालखी वारीतील भाविकांसाठी ज्याप्रमाणे ठराविक अंतरावर विश्रांती कक्ष आहेत त्याच पद्धतीने कोकणातून महाड भोर पंढरपूर रस्त्याने जाणाऱ्या पालखी वारीतील भक्तांसाठी विश्रांती कक्ष उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे व विन्हेरे विभागातील दिंडी सोहळ्याच्या आयोजन करणारे फौजी अंबवडे गावचे रहिवासी सखाराम पवार यांनी सांगितले.
पंढरपूरच्या वारीसाठी पुणे त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाड्यातून जाणाऱ्या पालखी वारीतील दिंडीसाठी ज्याप्रमाणे ठराविक अंतरावर राज्य शासन व केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांवर विश्रांती कक्ष उभारण्यात आलेले आहेत या विश्रांती कक्षाचा उपयोग पालखी वारीतील पालखी दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या पुरुष मंडळींसह महिलांना मोठ्या प्रमाणावर होतो विश्रांती कक्षामध्ये असणाऱ्या प्रसाधनगृहाचा वापर प्रामुख्याने महिला वर्गांना मोठ्या प्रमाणावर मिळाल्याने दिलासा मिळत आहे.
कोकणातून विशेषता रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातून व रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली, मंडणगड, खेड, या तालुक्यातील अनेक पालख्या दरवर्षी नित्यनियमाने पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी व कार्तिकी वारीसाठी महाड भोर पंढरपूर रस्त्याने जातात महाड भोर पंढरपूर रस्त्याचे सध्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे यामुळे हा रस्ता भोर पर्यंत मोठ्या प्रमाणावर चिखलाच्या साम्राज्यांनी व्यापला आहे मात्र या रस्त्याने जाणाऱ्या असंख्य पालखी मधील दिंडी तील महिलांना मागील चार वर्षापासून या या खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. मात्र या मार्गावरील कोणत्याही ठिकाणी पालखी वारीतील व दिंडी मध्ये सामील झालेल्या वारकरी संप्रदायातील मंडळींना थांबण्यासाठी कोणत्याही ठिकाणी विश्रांती कक्ष तसेच प्रसाधनगृहाची सोय नसल्याने पालखी वारीतील महिलांना मोठा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाड भोर पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहाय्याने पालखी मार्गावर विश्रांती कक्षा बरोबर प्रसाधनगृहाची सोय करावी अशी मागणी विन्हेरे विभागातील पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करणारे फौजी आंबवडे गावचे दिंडीचे सल्लागार सकाराम पवार यांच्यासह पायी दिंडी मधल्या अनेक वारकऱ्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह महाडचे आमदार व राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडून व्हावी अशी अपेक्षा स्थानिक दिंडी मधील भक्तांकडून केली जात आहे.