रायगड जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या सोडविण्याबाबत त्वरीत बैठक आयोजित करण्यात यावी यासाठी पत्रकार अर्जुन कदम यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांना अलिबाग येथे निवेदन दिले.
सर्व प्रथम रायगड जिल्हा पालकमंत्री म्हणून आपली निवड झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या रायगड जिल्ह्यात खालापूर, पेण, पनवेल,रोहा येथे वसाहती आहेत. अद्यापही अनेक नागरी सुविधा, पर्यायी जमीन, प्रकल्पग्रस्त दाखले या पासून वंचित आहेत. त्याच प्रमाणे शासन निर्णय क्र. पुनर्व.-२०२५/प्र. क्र.०७/२-८ दिनांक ७/४/२५ रोजी च्या शासन निर्णयात अनेक कोयना प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांना सुविधा देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे ही गावे नागरी सुविधा पासून कायम वंचित राहणार आहेत, गेली ६५ वर्षे ही होरपळ सुरू आहे, कोयना प्रकल्पग्रस्त जनता ही शांत संयमी असल्याने आज पर्यंत अन्याय सहन करत आहे. आपणच लवकरच कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या संदर्भात बैठक आयोजित करू,असे आश्वासन पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले.