तालुक्यातील पंचायत समितीच्या माटवण गणातून निवडून लढलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवार हर्षदा वरवाटकर यांना रायगड जिल्हा युवती अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि महाराष्ट्र राज्य युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते यांच्याहस्ते बुधवार, दि. 8 एप्रिल 2026 रोजी हर्षदा वरवटकर यांची रायगड जिल्हा युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
हर्षदा वरवटकर या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेतील माटवण पंचायत समिती गण पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना 2 हजार 124 मते मिळाली होती. हर्षदा वरवटकर यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हर्षदा वरवटकर यांची रायगड जिल्हा युवती अध्यक्ष पदाकरिता शिफारस केली. यानुसार रायगड जिल्हा युवती अध्यक्षपदी हर्षदा वरवटकर यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदश्चंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मुंबई येथे करण्यात आली.