रायगडमध्ये महिला तलाठी व मंडल अधिकारी १० हजाराच्या लाच प्रकरणात अटकेत

Acb
अलिबाग  (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील मौजे आगरकोट येथील जागेवर वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ (वय-५४) यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लाचेची उर्वरित रक्कम म्हणजेच पाच हजार रुपये नंतर देण्याचा इशारा करणारे मंडलाधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर (वय-५७) यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक ७ मे २०२५ रोजी केली. तक्रारदाराने वारस नोंदणीसाठी संबंधित जमिनीचे कागदपत्र घेऊन कार्यालयात गेल्यानंतर तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी प्रत्येकी ५,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ६ मे रोजी दाखल करण्यात आली होती. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यावर पथकाने सापळा रचला.
सापळा कारवाईदरम्यान तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी तक्रारदाराकडून ५,००० रुपये घेतले. त्याच वेळी मंडल अधिकारी मापुसकर यांनी उर्वरित रक्कम नंतर आणण्यास सांगितले. पथकाने तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले.
ही कारवाई उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, महिला पोलिस हवालदार सुषमा राऊळ आणि चालक पोलिस शिपाई सागर पाटील यांच्या पथकाने केली.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *