रायगड जिल्ह्यामध्ये ३२ रायगड लोकसभा निवडणुकीच्या जोरदार लढतीच्या अंतिम प्रचार चरणात शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. माणगांव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची साथ सोडत उद्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी आमदार भरत गोगावले यांनी माणगांव येथे पत्रकार परिषद घेत परिषदेत उपस्थितांना विशेषतहा शेकापक्षाच्या लाल बावट्याला दे धक्का अशी रमेश मोरे यांच्या उपस्थितीमध्ये माहिती दिली आहे.
यावेळी शेकापचे रमेश मोरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मी हा शिवसेना पक्ष प्रवेश करत आहे असे सांगितले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्या मोर्बा गावात इंडिया आघाडीने शेकापने सभा घेतली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन केले तेथीलच मोर्बा गटातील या माजी जिल्हापरिषद सदस्याचा पक्ष प्रवेश महायुती साठी महत्वाचा मानला जात आहे.
या पक्ष प्रवेशाच्या घोषणा प्रसंगी शिवसेना नेते तथा नवनियुक्त प्रवक्ता ॲड.राजीव साबळे, जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर, शिवसेनेचे पदाधिकारी अरुण चाळके, ॲड.महेंद्र मानकर, विरेश येरुणकर, सुनिल पवार, माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, नगरसेवक कपिल गायकवाड आदी मान्यवरांचे उपस्थित होते.