यशासाठी सत्य, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक – आमदार महेश बालदी

तुपगांव येथे उद्योगपती व समाजसेवक विनोद भोईर यांच्या आर.के. डेव्हलपर्सच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
चौक | अर्जुन कदम
 जीवनात यशस्वी होण्यासाठी सत्य, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नांची जोड आवश्यक असून, त्यातूनच विनोद भोईर यांच्यासारखे यशस्वी समाजसेवक व उद्योगपती घडतात, असे गौरवोद्गार आमदार महेश बालदी यांनी काढले.
भारतीय जनता पक्षाचे वडगाव पंचायत समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक व उद्योगपती विनोद भोईर यांनी तुपगाव येथील चौक-तुपगाव रस्त्यावर आर.के. डेव्हलपर्स (राधा कृष्ण डेव्हलपर्स) यांच्या अत्याधुनिक नवीन कार्यालयाची उभारणी केली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. विनोद भोईर यांनी लहानपणीच वडिलांचे छत्र गमावले. त्यानंतर त्यांनी आणि बाबू भोईर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व कष्टाने व्यवसायाचा विस्तार केला. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी भाजपचे उत्तर रायगड उपाध्यक्ष व उद्योगपती सुधीर ठोंबरे, मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार, उद्योगपती यासीन भालदार, प्रविण काळबागे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड तसेच मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी विनोद भोईर यांना नवीन कार्यालयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रगती ठोंबरे यांच्या ओंकार प्रासादिक भजन मंडळ, आसरोटी यांच्या सुमधुर भजनांचा कार्यक्रमही झाला. आमदार महेश बालदी यांनी भजनाचे श्रवण करून कलाकारांचे कौतुक केले.