मोरबे येथे गटार बांधकाम योजनेचे भूमिपूजन

मोरबे येथे गटार बांधकाम योजनेचे भूमिपूजन
चौक | अर्जुन कदम 
मोरबे धरणग्रस्त वसाहत मोरबे येथे गटार योजनेच्या बांधकामाचे भूमिपूजन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मोरबे हे गाव मोरबे धरणग्रस्त वसाहत असून येथे पंचायत समिती सेस निधीतून गटार योजनेचे काम मंजूर झाले असून त्यांचे भूमिपूजन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते व उपसरपंच नैना झिंगे, ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे, सदस्या सौ.राणे, पिंट्या राणे यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी मोरबे धरणग्रस्त वसाहत मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोरबे धरणग्रस्त महिला यांनी सरपंच रितू ठोंबरे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. गावच्या नागरी सुविधा कामाला मंजुरी दिल्या बद्दल ग्रामस्थ यांनी सभापती कृष्णा पारंगे, उप सभापती भाई शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड व पंचायत समिती यांचे आभार व्यक्त केले.