पळसदरी मार्गे कर्जत-खोपोली मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य! साम्राज्य खालसा करणार कोण?

#पळसदरी मार्गे कर्जत-खोपोली मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य!
चौक | अर्जुन कदम 
कर्जत -खोपोली व्हाया पळसदरी मार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, हे साम्राज्य खालसा कोण करणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते किरण हडप यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत -खोपोली व्हाया पळसदरी मार्गावर विकासाची गंगा सुरू झाली आहे, निसर्ग सुंदर परिसर, त्यात कर्जत खोपोली चे अंतर कमी करणारा मार्ग म्हणून ओळखला जातो.अनेक प्रकल्प या मार्गावर उभे राहत असून या मार्गाची वर्दळ वाढली आहे, आता पावसाळी पर्यटन सुरू झाले आहे, त्यांनी आणखी वर्दळ वाढली आहे. हा रस्ता पूर्ण झाला नाही, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे, का आहे? त्याचे कारण गुलदस्त्यात असून ते कदाचित लोकप्रतिनिधी यांना माहित असावे! या मार्गावर काही खड्डे जीवघेणे तयार झाले आहेत. अनेकांनी या मार्गावरून प्रवास करून अपंगत्व स्वीकारले आहे, अनेकांचे अपघाताने नुकसान झाले आहे.
दरम्यान , नुकताच या मार्गावर निरापराध होऊन जीव गेला आहे, तरीही या मार्गाची मालकी अथवा देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ कारभाराने लक्ष दिले नाही. याची खंत व्यक्त होत आहे. आणखी किती अपघात अपेक्षित असून किती जीव गेल्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम होणार आहे असे संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. श्रावण महिना सुरू होत असून अनेक भाविक या मार्गावरून ये जा करणार आहेत, गणपती बाप्पा यांचे आगमन होणार आहे, हे या यंत्रणेने लक्षात घेऊन दुरुस्ती करावी, त्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही करण्यात येत आहे.