मैत्री खातीर दिलेली कार पठ्ठ्याई ठेवली गहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Fir

पनवेल :

गुजरात येथे जाण्याकरता कार घेऊन ती कार परत न केल्याप्रकरणी निकुज प्रफुल्ल शहा (रा. भांडुप वेस्ट मुंबई), प्रफुल्ल शहा आणि आयुष मोटा या तिघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बी एन एस कलम 3 (5), 316 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण लबडे हे खानावळे येथे राहत असून त्यांचा साडी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार एम एच 46 सी एच 8345 आहे. त्यांची ओळख एपीएमसी मार्केट येथील निकुज शहा व आयुष मोटा यांच्यासोबत झाली. त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. मार्च महिन्यात निकुज याने फोन करून नातेवाईक आजारी असल्याने वडिलांना अर्जंट गावी गुजरात येथे जायचे आहे. त्यासाठी कारची मागणी केली. त्यानंतर त्यांचे वडील प्रफुल्ल शहा यांचा फोन आला व दहा दिवसांनी गावावरून परत आल्यावर गाडी परत देतील असे सांगितले.
निकुज आणि आयुष मोटा कार घेऊन गेले. त्यांना एप्रिल महिन्यात फोन केला असता चार-पाच दिवसात येतो असे सांगितले. मात्र कार परत आणली नाही. निकुज यांच्या वडिलांना फोन करून विचारणा केली असता कार तीन लाख रुपयांमध्ये गहाण ठेवली असल्याचे सांगितले. त्यामुळे निकुज शहा, प्रफुल शहा आणि आयुष मोटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *