चाणाक्ष आजीच्या सतर्कता व धाडसामुळे चोरटे पोलिसांच्या ताब्यात, लोकप्रतिनिधीकडून सत्कार

Pawar Aaji

आरोपीकडून आजीची साधारण 80हजाराची सोन्याची बांगडी हस्तगत

नागोठणे ( महेंद्र माने ) :

ठाणे जिल्ह्यातील कळवा – खारेगाव येथील गीता तुळशीराम पवार या 72 वर्षीय डॅसिंग आजीने गुरुवार 18 जुलै रोजी तिचे सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या चोरांना पोलिसांच्या मदतीने पकडून दिले. आरोपींकडून पोलिसांनी आजीची साधारण 80,000रु. किंमतीची सोन्याची एक बांगडी हस्तगत केली.
मिळालेल्या माहितीनुसार सदरील आजी गुरुवार 18 जुलै रोजी सायंकाळी खारेगाव येथून दत्तवाडी येथील स्वामी समर्थ मठात जाण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यांच्या हातात साधारण पाच तोळ्याच्या दोन बांगड्या असल्याने बस स्टॉपवर उभे असलेल्या चोरांची त्यावर नजर गेली. ठाणेकडे जाणारी टी.एम.टी. बस आली त्यावेळी आजी बसचे मागील दाराने बसमध्ये चढत असताना खुप गर्दी होती. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी मला आजी इकडून या, इकडे बसमध्ये जाण्याकरीता जागा आहे असे बोलून आजीला बोलावले त्यावेळी आवाज देणारे आजीला बोलण्यात गुंतवून ती बसचे मागील दारातून आत चढत असताना तिच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी कोणत्या तरी साधनाने कापून लबाडीने लंपास केली.
आजीच्या ते लक्षात आले त्याचवेळी बस चालू झाली त्यावेळी आजीने आरडा ओरडा केल्याने बस काही अंतरावर जावून थांबली,खाली उतरल्यावर बाहेर गस्तीवर असणारे पोलीस (बिट मार्शल) तेथून जात असताना त्यांना घडलेला प्रकार आजीने सांगितला. तत्परतेने पोलिसांनी आजीला सोबत घेऊन घटना घडली त्याठिकाणी खारेगाव नाका, टी.एम.टी. बसस्टाप जवळ आणेपर्यंत आजी वाटेत चोरांना शोधत होती. त्यांना बस स्टॉपवर आणल्यानंतर आजी परत येणार नाही आता दूसरा सावज शोधण्याच्या विचारात ते चोर तिथेच एका बाजूला उभे होते. तात्काळ आजीने त्यावेळी आवाज देणारे व हातातून सोन्याची बांगडी चोरी करणारे दोन्ही अनोळखी इसम त्याच ठिकाणी उभे असल्याचे मी पोलीसांना सांगीतले.
पोलिस जवळ येतात हे बघून त्या इसमांनी पलायन केले. पण पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दोन चोरांना पकडण्यात यश मिळविले. पोलीसांना सदर दोन्ही अनोळखी इसमांना ताब्यात घेवून कळवा पोलीस स्टेशन येथे आणले व त्यांच्याकडून आजीची साधारण 80,000 रुपये किंमतीची सोन्याची एक बांगडी हस्तगत केली. चाणाक्ष आजीची सतर्कता व धाडसामुळे चोर सापडल्याने कळवा – खारेगाव परिसरातून आजीचे कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नगरसेवक उमेश पाटील यांनी केला सत्कार
गीता पवार या 72 वर्षीय आजीने दाखविलेल्या धाडसाबद्दल ठाणे महानगर पालिका खारेगावचे नगरसेवक उमेश पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह आजींच्या घरी जाऊन घडलेली घटना जावून घेत तिचे कौतुक करीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मानित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *