माथेरानमध्ये गारपीट

Matheran Garpeeth
कर्जत ( गणेश पवार ) :
उकाड्यापासून हैराण झालेल्या माथेरानकरांना व पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.जोरदार वारा व पावसाबरोबर मोठ्या प्रमाणत गारपीट झाल्याने माथेरान पुन्हा गारठले आहे. मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस व वारा यांचा लपंडाव पहावयास मिळत आहे.त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना माथेरानच्या गारपीटीचा आनंद घेता आला.
 रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळी मंगळवार दि.14 रोजी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार वारा आणि पाऊस यांचा लपंडाव सुरू असताना अचानक गारपीटीस सुरुवात झाली माथेरान मधील सर्व घरांचे छप्पर हे पत्र्याचे असल्याने पावसाच्या थेंबाबरोबर टपटप आवाज येऊ लागला म्हणून नागरिकांनी बाहेर येऊन पाहतायत तर गारा सर्वत्र दिसू लागल्या.अचानक आलेल्या गारपिटीने नागरिकांसोबत पर्यटकही हे दृश्य टिपण्यास पुढे आले. जिकडेतिकडे गाराचगारांचा खच दिसत होता.वारा,पाऊस आणि त्यात गारा यांची स्पर्धा सुरू आहे की काय असे चित्र होते. माथेरानचा पारा 32 हुन सरळ 26 कडे आला इतका थंडावा वातावरणात पसरला.गारा वेचण्यासाठी लहानग्यांसोबत मोठेही सरसावले होते.
यावर्षी मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. रविवारी थोड्या प्रमाणात पाऊस झाला.सोमवारी मतदान सुरू असताना जोरदार वादळी वारा आणि थोडा पाऊस झाला तर मंगळवारी संध्याकाळी वारा,गारपीटीसह पाऊस झाला.सुरुवातीला पावसाचे प्रमाण अत्यल्प होते व गारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते.नंतर पावसाचे खरे रूप पाहवायस मिळाले अर्ध्यातासात मुसळधार पाऊस माथेरान मध्ये झाला आणि कमालीचा गारवा सर्वत्र पसरला.या गराव्यामुळे येथे आलेला पर्यटक सुखावला असून पुढे येणाऱ्या दिवसात थंड माथेरान पर्यटकाना अनुभवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *