महाड -मंडणगड मार्गावर अर्धवट पुलाच्या कामामुळे अवकाळी पावसात चिखलाचे साम्राज्य!

महाड | मिलिंद माने 
महाड मंडणगड खाडीपट्ट्या मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मागील चार वर्षापासून चालू आहे याच रस्त्यावरील चोचिंदे वणि कोंड रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवकाळी पावसात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने चिखलामुळे अनेक वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र संध्याकाळच्या सुमारास पाहण्यास मिळाले.
महाड मंडणगड खाडीपट्टा मार्गे जाणारा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मागील चार वर्षापासून चालू आहे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे याच रस्त्यावर महाड जवळील चो चिंदे वणी कोंड रस्त्यावर एका छोट्या पुलाचे बांधकाम चालू आहे त्यासाठी या ठिकाणी बाह्य वळण रस्ता तयार करण्यात आला आहे, मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पूर्वी मातीचे साम्राज्य पसरलेले होते त्यातच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या धुळीचे चिखलात रूपांतर झाले या चिखलातून मार्ग काढताना अनेक दुचाकी स्वरांना तसेच चार चाकी वाहनांना देखील तारेवरची कसरत करावी लागली.
महाड खाडीपट्टा मार्गे मंडणगड कडे जाणाऱ्या या रस्त्यावर अवकाळी पावसातच पुलाच्या अर्धवट कामामुळे चिखलातून वाहने काढताना वाहन चालकांना करावी लागलेली तारेवरची कसरत पाहता या अर्धवट पुलाचे बांधकाम पावसाळा चालू होण्यास एक महिन्याचा अवधी शिल्लक असताना झाले नाही तर या ठिकाणावरून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे