अल्पवयीन मुलीशी लग्न करून अत्याचार; आरोपीविरुद्ध वडखळ पोलिसांत गुन्हा

पेण तालुक्यातील बावीस वर्षीय पठ्ठ्याच्या अत्याचारातून अलिबागची अल्पवयीन मुलगी गर्भवती
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील गौळवाडी येथील एका तरुणाने अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये आरोपी रोहीत राजु खंडवी (वय २१, रा. गौळवाडी पो. पाबळ ता. पेण, जि. रायगड) याने पीडित अल्पवयीन मुलीशी विवाह केला. पीडिता ही अल्पवयीन असून संमती देण्यास असमर्थ असल्याची पूर्ण माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
या संबंधातून पीडिता गर्भवती राहिली असून दिनांक १७ मार्च २०२६ रोजी तिची प्रसूती होऊन तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सांगळे करत आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.