पेण तालुक्यातील हमरापूर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी एका अनोळखी इसमाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्राप्त महितीनुसार, सकाळी सव्वा आठच्या सुमारास मडगाव-नागपूर 01140 अप एक्सप्रेस गाडी रुळांवरून जात असताना हा अपघात झाला. अनोळखी इसम रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना गाडीची धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) चे पोलीस शिपाई रामरतन डुंगरराम जाणी यांनी दिली आहे. सदर अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.