मंत्री भरतशेठ गोगावले यांचं पोलादपूरमध्ये जंगी स्वागत

Bharatsheth Gogavale
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
महाड 194 विधानसभा मतदार संघामध्ये विजयाचा ऐतिहासिक चौकार मारल्यानंतर आ.भरतशेठ गोगावले यांना अपेक्षेप्रमाणे कॅबिनेटदर्जाचे रोहयो, खारजमीन आणि फलोत्पादन खात्यांचे मंत्री पद जाहिर झाले. यानंतर नागपूर येथून हवाईमार्गे मुंबई आणि तेथून मोटारीने मतदार संघाचा प्रवास करताना ठिकठिकाणी जनतेचे ॠण व्यक्त करीत स्वागत शुभेच्छा स्विकारीत मध्यरात्रीच्या सुमारास पोलादपूर या शेवटच्या थांब्यावर ना.भरतशेठ गोगावले यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असल्याने पोलादपूर शहरात लवकरच काळोखाचे आणि थंडीचे साम्राज्य पसरले असताना गरिबांचे शेठ आमदार झाल्यानंतर नामदार होऊन येणार असल्याने सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र, जसजसा उशिर होऊ लागला तसतसे शेठ लोणेरेत आलेत, गोरेगावला गेलेत, महाडमध्ये 2 तास झाले, असे संदेश कार्यकर्त्यांना मिळू लागले. यामुळे असंख्य पोलादपूरकर आपआपल्या घरी परतले असताना अचानक महाडकडून पोलादपूरकडे निघाल्याचा संदेश आला आणि पुन्हा पोलादपूरच्या छ.शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळयाच्या परिसरातील स्टेजभोवती उत्साही कार्यकर्त्यांची गर्दी जमली.
नगरपंचायत पोलादपूरकडून नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासाठी चंदेरी गदा आणि शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, मनोज प्रजापती, विनायक दिक्षित, सिध्देश शेठ, प्रसाद इंगवले, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, नगरसेविका स्नेहल मेहता,अस्मिता पवार, शिल्पा दरेकर, शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक सुरेश पवार यांनी भव्य सत्कार केला.
यावेळी ना.भरतशेठ यांच्या समवेत माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृउबा सभापती लक्ष्मण मोरे, नायक मराठा समाज अध्यक्ष सुनील मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच वैशाली भुतकर तसेच ज्योत्स्ना केसरकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना.भरतशेठ गोगावले यांचा सत्कार स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर, नंदीवाले, हमाल पंचायत, व्यापारी असोसिएशन तसेच युवासेना आणि अन्य संघटनांनी ना.गोगावले यांच्या सत्कारासाठी आवर्जून उपस्थिती दर्शविली. जेसीबीतून पुष्पवर्षाव आणि मोठे हारदेखील ना.गोगावले यांना घालण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *