कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे संर्पक प्रमुख असलेले किरण ठाकरे यांनी आज रॉयल गार्डन येथे सभा घेत शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवार नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. तर किरण ठाकरे यांच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे व गळ्यात पट्टे असल्याचे चित्र असल्याने मात्र कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात महायुती मध्ये बिघाडी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने व त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचा राजीनामा देणारे सुधाकर घारे व भाजपाचे किरण ठाकरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज भरला आहे. त्यांमध्येच महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे नितिन सावंत यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे व महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी घोषीत झाल्याने मात्र निवडणूक ही चौरंगी की तिरंगी होणार या संदर्भात मतदार मध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे स्थिती पाहवयास मिळत आहे.
सध्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असल्याने कर्जत – रवालापूर विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असल्याने निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचा राजीनामा देणारे सुधाकर घारे यांनी दि. २४ ऑक्टोंबर रोजी आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज भरला आहे.
भारतीय जनता पार्टीचे कर्जत – खालापूर विधानसभा संर्पक प्रमुख असलेले किरण ठाकरे यांनी आज दि. २८ ऑक्टोंबर रोजी कर्जत मधिल रॉयल गार्डन येथे कार्यकर्त्यांची सभा घेत रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत रॉयल गार्डन ते मुर्दे, मार्गे छात्रपत्ती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मुख्य बाजार पेठ येथून कपालेश्वर मंदिरात दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कर्जत प्रशासकीय भवन येथे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या कडे आपला अपक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
मात्र घेतलेल्या सभेमध्ये व नामनिर्देशन अर्ज भरण्याकरीता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या हता मध्ये भाजपाचे झेंडे व गळ्यात पट्टे असल्याने, व भाजपा महायुतीचा घटक पक्ष असल्याने मात्र महायुतीमध्ये बिघाडी झाली का? असा प्रश्न मात्र मतदार संघात उपस्थित होत आहे. तर महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे नितिन सावंत यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे व महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी घोषीत झाल्याने मात्र निवडणूक ही चौरंगी की तिरंगी होणार या संदर्भात मतदार मध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे स्थिती पाहवयास मिळत आहे.
———————————-
मी आज पक्षाचा व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहे. आम्ही महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे भाजपाच्या उमेदवारीसाठी मागणी केली होती. त्यानुसार आज या उद्याचा दिवस अर्ज भरण्यासाठीचा वेळ असल्याने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे. पक्षाचा अर्ज मागे घेण्याचा आदेश आला तर अर्ज मागे घेऊ, मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. माझ्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा पहाता मोठ्या प्रमाणात ताकत मिळेल.
:-किरण ठाकरे, भाजपा कर्जत – खालापूर विधानसभा संर्पक प्रमुख,