भाजपाचे पेणचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार रविंद्र (रविशेठ) पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीसह दाखल केला.
या प्रसंगी खासदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी आमदार अनिकेत तटकरे, भाजपा युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील आणि अन्य मान्यवरांनी हजेरी लावली.
रॅलीनंतर जाहीर सभेत, अनिकेत तटकरे यांनी पाटील यांना 70 ते 80 हजार मताधिक्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली, तर खासदार धैर्यशील पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.