भरदिवसा विवाहितेचे दागिने लुटले, महिलांमध्ये भीतीचं वातावरण

Chor Chain
पनवेल :
पनवेल परिसरात एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.
साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये आलेल्या एका विवाहितेच्या गळ्यातील तब्बल २० तोळे वजनाचे गंठण लुटण्याचा प्रयत्न दुचाकीवरून आलेल्या चोराने केला.
मात्र यावेळी गंठणची पट्टी तुटल्याने चोराने त्याच्या हाती लागलेली अडीच लाखांची गंठणची पट्टी घेऊन पलायन केल्याची घटना पनवेलमध्ये भर दुपारी घडली.
याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भरदिवसा चोरट्यांकडून अश्या प्रकारे चोरीचे प्रयत्न होत असल्याने महिला वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *