रोहा : रोहा शहरातील अष्टमी येथिल श्री स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताहास मोठया उत्साहात सुरूवात झाली आहे. यामुळे अष्टमीत सेवेकऱ्यांची मोठी वर्दळ दिसुन आली, सप्ताह दरम्यान अखंड नाम, जप, यज्ञ, याग आदी धार्मिक विधी व कार्यक्रम अष्टमी केंद्रात संपन्न होत आहेत.
अष्टमी येथिल दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास आणि बाल सुसंस्कार केंद्रात या धार्मिक उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ सप्ताह म्हणजे रोहा अष्टमीकरांचा एक कौटुंबिक धार्मिक सोहळा म्हणुन सर्वपरिचित आहे. परिणामी अष्टमीत सप्ताह काळात सेवेकऱ्यांची मोठी वर्दळ असते. शेकडो सेवेकरी आपली सेवा रुजू करण्यासाठी येथे येतात.
