बॅटरी चोर निघाले Bsnl चे कर्मचारी, मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद

बॅटरी चोर निघाले Bsnl चे कर्मचारी, मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
रायगड (अमुलकुमार जैन) : 
महाड तालुक्यातील वाकी येथे बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवर साठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये किंमतीची एकूण २४ बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले असल्याची तक्रार बीएसएनएलचे ज्युनिअर इंजिनिअर तुषार चौधरी यांच्या फिर्यादीनुसार महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार, १४ जानेवारी रोजी बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवर साठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये किंमतीची एकूण २४ बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले असल्याची तक्रार दाखल होताच अवघ्या काही तासांतच बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या टिमने अटक केले आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये बीएसएनएल कंपनीचे चार कर्मचारी सचिन काशीराम तुपट वय 45 वर्ष, राहणार शिरगाव तालुका महाड जिल्हा रायगड 2) प्रदीप दशरथ गिरी वय–47 वर्ष रा दादली तालुका महाड जिल्हा रायगड 3) प्रसाद चरणदास पाटील वय 46 वर्ष, रा दासगाव तालुका महाड जिल्हा रायगड 4) संकेत वासुदेव पाटील वय -34 वर्ष, सध्या राहणार दादली तालुका महाड जिल्हा रायगड , मूळ राहणार देहेन पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग जिल्हा तर इतर तीन संशयित आरोपी 1) इमरान सलीम मलिक वय-31वर्ष, धंदा- स्क्रॅप गोळा करणे, सध्या राहणार तांबट भुवन पोलादपूर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड, हुमायु नगर, मेरठ उत्तर प्रदेश 2) योगेश धर्मेंद्र दौंड वय-22वर्ष, राहणार आदर्श नगर महाड तालुका महाड जिल्हा रायगड मोबाईल 3) नईम सलीम मलिक वय-25 वर्ष, सध्या राहणार-तांबड भुवन पोलादपूर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड मूळ राहणार जे जे कॉलनी बवाना नॉर्थ वेस्ट दिल्ली असै एकूण सात आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *