तालुक्यातील सडवली आदिवासी वाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका प्राजक्ता मोरे आणि त्यांच्या सहशिक्षिका रूपाली चिकणे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात रंगपंचमीनिमित्त आनंदाचे रंग भरले तर दुसरीकडे सर्वात दुर्गम असलेल्या ढवळे गडाच्या पायथ्याशी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उल्हास पवार या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना रंगात रंगण्याचा आनंद मनसोक्त लुटण्याची संधी दिली.
पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी आणि रवळनाथाची पालखी रात्री गोंधळ आणि पशूबळी झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास ग्रामप्रदर्शनेच निघाली. सावंत कोंड पार्टे कोंड भागातून काठी आणि पालखी पोलादपूर शहरात पुन्हा परत आल्यावर पश्चिमेकडील लोकवस्तीतील ग्रामस्थांनी दर्शन घेतल्यानंतर पूर्वेकडील पोलादपूर शहरात पालखीचे आगमन झाले.
प्रभात नगर, जाकमातानगर, भैरवनाथनगर, महाबळेश्वर जुना रस्ता, आनंदनगर, सिद्धेश्वर आळी, छत्रपती शिवाजीनगर, बाजारपेठ, जोगेश्वरी गाडीतळ, तांबडीचा आवाड, सह्याद्री नगर, साईनाथ नगर, गोकुळ नगर, सैनिक नगर, तांबड भुवन अशी काठी पालखीची ग्रामप्रदक्षिणा सायंकाळी उशिरा ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान मंदिरामध्ये पोहोचून रविवारी रात्री होलीकोत्सवापासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाची सांगता झाली. पोलादपूरच्या ग्रामदैवत ठीक आहे भावना देवस्थानचे अध्यक्ष बाबुराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिमगोत्सवाची सांगता भक्तीमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाली.