पोलादपूर भाजप महिला आघाडीत प्रवेश करताच मंगल झाडाणे यांची अध्यक्षपदी वर्णी

Mangala Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : तालुका भाजप अध्यक्षपदाची धुरा तुकाराम केसरकर यांनी स्विकारल्यानंतर झालेल्या संघटनात्मक बैठकीमध्ये गांजवणे गावातील धडाडीच्या कार्यकर्त्या सौ.मंगल झाडाणे यांचा त्यांच्या महिला समर्थकांसमवेत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीमध्ये जाहिर प्रवेश घेण्यात आला. यावेळी मंगल झाडाणे यांची महिला अध्यक्षपदी नियुक्तीही जाहिर करण्यात आली. पोलादपूर शहर भाजपा अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षे समर्थपणे पाहणारे राजाभाऊ दिक्षित यांची पुन्हा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पोलादपूर विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक पक्षबैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस बिपीनदादा म्हामूणकर, संदीप ठोंबरे, राजन धुमाळ, समीर सुतार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमाताई मानकर, मंजुषा कुद्रीमोती, पोलादपूर शहरातील अॅड. कलिका अधिकारी, जोशीबाई तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गेल्या महिन्यापासून पोलादपूर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आणि विधानसभा कार्यकारिणीची पदे भरण्यासाठी अध्यक्ष तुकाराम केसरकर यांनी प्राधान्य दिले असून अध्यक्षांच्या शिफारसीखेरिज कोणाचीही कोणत्याही पदावरील परस्पर नियुक्ती वैध होणार नसल्याची माहिती यावेळी केसरकर यांनी दिल्याने भाजपच्या संघटनेला शिस्तबध्दतेचे वळण लागण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *