पोलादपूर पोलिसांची धडकेबाज कारवाई; 4 बैलांसह 3 गाडया जप्त, तिघे अटकेत

Bail & pick up
पोलादपूर | शैलेश पालकर 
पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या माटवण बौध्दवाडी येथून बेकायदेशीररीत्या गुरे वाहून नेण्यात येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी तातडीने पोलादपूर पोलिसांना कळविले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चार बैलांसह तीन वाहनेही जप्त करीत तिघे आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली.
पोलादपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वाहनांतून चार बैलांची वाहतूक होणार असल्याची खबर गोरक्षकांना मिळाल्याने त्यांनी पोलादपूर पोलीसांना खबर दिली.  त्यामुळे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्यासह पोलीसांनी तातडीने माटवण बौध्दवाडी परिसरात पोहोचून तानाजी गणपत मोरे (वय 26, रा. सुतार आळी, बिरवाडी, ता. महाड) विशाल लक्ष्मण म्हस्के (वय 31, रा. माटवण, ता.पोलादपूर) आणि लहू महादेव वेनुपुरे (वय 26, रा. मु.पो. हिरडोशी, ता. भोर, जि. पुणे)  या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातील सफेद रंगाची पिकअप (एमएच06सीपी0169) व पिकअप (एमएच 12 एएम 7649) तसेच स्विफ्ट (एमएच 11 डीएन 8158) या तीन वाहनांना पोलिसांनी जप्त केले.
या वाहनांत एकूण चार बैल आढळून आले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एन. पी. कोंडाळकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *