राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून पोलादपूरचे भूमीपुत्र व भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नाने पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील काळकाईमाता क्रीडा व सामाजिक संस्थेला देवाभाऊ रूग्णवाहिका प्रदान करण्यात आली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पोलादपूर शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोर राष्ट्रवादी-भाजपच्या प्रमुखांची तसेच काळकाईमाता क्रीडा व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी आ.प्रवीण दरेकर यांचे निकटवर्ती माजी अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, विद्यमान अध्यक्ष वैभव चांदे, महाडचे अध्यक्ष महेश शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, शहरअध्यक्ष महेश निकम, सुरेंद्र चव्हाण, डॉ.राजेश शिंदे, डॉ.घनश्याम शेठ, डॉ. संजय वि.शेठ, नगरपंचायतीचे विरोधी गटनेते दिलीप भागवत, ऍड.सचिन गायकवाड, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष तनुजा भागवत, संतोष मोरे, नितीन म.शेठ, भाजप अल्पसंख्यांक नेते मुश्ताक मुजावर, राजेश जांभळेकर, प्रदीप नरे, विजय दरेकर, राजेश सकपाळ, सपना बुटाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित खेडेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.प्रवीणभाऊ दरेकर आणि मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना कोतवाल बुद्रुकच्या ग्रामस्थांसह पोलादपूर शहरातील समाजधुरिणांकडून धन्यवाद देण्यात आले.