पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूलचा ९७.२९% निकाल – यशस्वी विद्यार्थ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!

Pen Private Highschool
पेण :
पेण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या प्रायव्हेट हायस्कूल पेणचा फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९७.२९ टक्के लागला आहे. एकूण १४८ विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेच्या शैक्षणिक यशात भरीव भर पडली आहे.
या परीक्षेत –
  • १९ विद्यार्थी उच्च श्रेणीत
  • ५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत
  • ५१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत
  • २४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
🏆 गुणानुक्रमे यश मिळवलेले पाच विद्यार्थी:
  1. 🥇 आर्यन अंकूश पाटील – ४३९/५०० (८७.८०%)
  2. 🥈 पार्थ राजकुमार घरत – ४३२/५०० (८६.४०%)
  3. 🥉 कुणाल दिनकर पाटील – ४२९/५०० (८५.८०%)
  4. 🎖 स्वरूप कैलास भोईर – ४२६/५०० (८५.२०%)
  5. 🎖 ओंकार विकास लांगी – ४२५/५०० (८५.००%)
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, उपकार्याध्यक्ष संजय कडू, सेक्रेटरी सुधीर जोशी, तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्या अंजली जोशी, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या शाळेने सातत्याने उत्तम निकालाची परंपरा जपत गुणवत्तेची शिकवण देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे.
उन्हाळी सुट्टीत MS-CIT करण्यासाठी पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल कम्प्युटर एक उत्तम पर्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *