पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव – कशेळे येथे त्रिशताब्दी जयंतीनिमित्त स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन

Holkakar punyatithi karjat
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) : 
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आजही पुरेशा प्रमाणात पुढे आलेला नाही, इंग्रजांच्या नोंदींमध्ये त्यांच्या कार्याचा चुकीचा आढावा घेतला जातो. त्या काळात दुष्काळ असल्याचा उल्लेख केला जातो, परंतु प्रत्यक्षात ज्या गावांवर अहिल्याबाई होळकर यांचे राज्य होते, तिथे कधीही दुष्काळ पडला नाही, असे स्पष्ट मत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी व्यक्त केले.
कशेळे ग्रामीण मंडळ विभागाच्या वतीने कशेळे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये वकृत्व, निबंध, वेशभूषा स्पर्धा, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कोळी म्हणाले की, अहिल्याबाईंनी मानवासोबतच प्राण्यांचाही विचार करून पाणी साठवण्यासाठी विहिरी आणि बारावांचे निर्माण केले. कर्जत तालुक्यातील कोटिंबे येथे आजही या वास्तू त्यांचे योगदान दर्शवतात.
कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती:
भाजप नेते वसंत भोईर, दीपक बेहेरे, अशोक ओसवाल, रमेश मुंडे, मंगेश म्हसकर, महिला मोर्चा अध्यक्षा संगीता हरपूडे, वकृत्व स्पर्धेचे परीक्षक मंगेश सावंत आणि मृणालिनी खेडकर, तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे:
  • वकृत्व स्पर्धा प्रथम क्रमांकअशोक भगत
  • वेशभूषा स्पर्धा प्रथम क्रमांकअस्मिता जाधव
  • निबंध स्पर्धा सन्मानितअपेक्षा करडे
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार – दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना
कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल कशेळे ग्रामीण मंडळ भाजप पदाधिकारी यांचे अविनाश कोळी यांनी विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *