अलिबाग (अमुलकुमार जैन) :
जून महिना जवळ येऊ लागताच रायगडकरांना वेध लागतात ते पावसाचे . कडाक्याच्या उन्हमुळे वैतागलेले रायगडकर चातक पक्ष्याप्रमाणे पाऊसाची वाट पाहू लागतात. पण पावसाळा आल्यानंतर सुद्धा त्यांना अनेक प्रश्न,संकट भेडसावत असतात. भर पावसात वाट काढत रायगड जिल्ह्यातील नागरिक तुडुंब भरलेल्या पाणथळ रस्त्यावरुन मार्ग काढत कामाचे ठिकाण गाठतात. तसेच आणखी एक भली मोठी समस्या नागरिकांना भेडसावत असते ती मोठ्या भारतीच्या लाटांची. यंदा संपूर्ण पावसाळ्यात अठरा दिवसांच्या कालावधी एकोणीस वेळा साडे चार मीटर पेक्षा मोठ्या लाटांचा कालावधी असून सर्वात मोठी लाट ही गुरुवार दिनांक २६जून २०२५रोजी दुपारी १२: ५५मिनिटांनी ४.७५मीटरची लाट येणार आहे तर सर्वात लहान लाट ही रविवार१०ऑगस्ट २०२५रोजी दुपारी १२:४७ मिनिटांनी साडे चार मीटरची लाट येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात तब्बल अठरा दिवस धोक्याचे असून जून ते सप्टेंबर याचार महिन्यात अठरा दिवसांमध्ये एकोणीस वेळा मोठ्या उंचीच्या अर्थात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भरती समुद्राला येणार आहे. त्यातील दोन लाटा या रात्रीच्या सुमारास येणार आहेत.त्यामुळे या मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास जिल्हा जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जुन आणि ऑगस्ट महिन्यात पाच दिवस अधिक उंचीच्या लाटा येणार आहेत तर सप्टेंबर महिन्यांत चार दिवसांत पाच वेळा लाटा येणार आहेत. तसेच जुलै महिन्यात सुद्धा चार दिवस लाटा येणार आहेत. दिवसांमध्ये सर्वात उंचीची भरती समुद्राला येणार आहे.
——————————————–
जून महिना हा जवळ येऊ लागताच मुंबईकरांना वेध लागतात ते पावसाचे.कडाक्याच्या उन्हमुळे वैतागलेले मुंबईकर चातक पक्ष्याप्रमाणे पाऊसाची वाट पाहू लागतात. पण पावसाळा आल्यानंतर सुद्धा त्यांना अनेक प्रश्न,संकट भेडसावत असतात. भर पावसात वाट काढत मुंबईतील नागरिक तुडुंब भरलेल्या पाणथळ रस्त्यावरुन मार्ग काढत कामाचे ठिकाण गाठतात. तसेच आणखी एक भली मोठी समस्या नागरिकांना भेडसावत असते ती मोठ्या भारतीच्या लाटांची. यंदा संपूर्ण पावसाळ्यात 18 दिवसांचा कालावधी हा मोठ्या भरतीचा कालावधी ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पावसाच्या घडामोडीचा अंदाज घेतला जातो. त्यात भारतीचे दिवस कोणते,लाटांची ऊंची किती या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात येतो. तसेच अतिवृष्टीवेळी अचानक घडणार्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी नियोजन केले जाते. यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस सर्वात मोठी भरती येणार असून त्यावेळी साडेचार मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता मांडण्यात आली आहे , असा अंदाजदेखील जिल्हा आपत्कालीन विभागाने दिला आहे.
——————————————–
पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामस्थ दरड, पूर आणि उधाणाची भरतीच्या दहशतीखाली वावरत असतात. रायगडमधील अनेक गावे समुद्र आणि खाडीकिनारी असून २४० किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. हा किनारा जिल्ह्यातील निसर्गसौंदर्यात भर टाकत असला तरी मोठ्या भरतीच्या वेळी हेच किनारे धोकादायक ठरतात. पावसाळ्यात मोठ्या लाटांचे पाणी अनेकदा गावात आणि शेतात शिरून नुकसान होते.
——————————————–
मुरूड तालुक्यातील ९, उरणमधील ४ गावांचा समावेश आहे, तर खाडीकिनारी असलेल्या पेण तालुक्यातील ९, अलिबाग ११, उरण ५, श्रीवर्धन ११, माणगाव २, महाड ६ आणि म्हसळ्यातील ११ गावांना उधाणाचा धोका आहे.
——————————————–
उधाण भरती आणि अतिवृष्टी एकाच वेळी झाल्यास सखल भागातील गावांत पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. भरतीमुळे पाणी ओसरत नसल्याने नदीकाठच्यप महाड, नागोठणे, रोहा या गावात पूरस्थिती निर्माण होते.
——————————————–
30 जुलै 2014 आठ रोजी मन सुन्न करणाऱ्या पहाटेची आठवण झाली. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात माळीण गावाचं काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं होतं. माळीण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 44 घरं गाडली गेली होती. यामध्ये तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नऊशे पेक्षा जास्त मुक्या जनावरांचाही यात मृत्यू झाला होता.
——————————————–
२३जुलै २०२१रोजी महाडमधील तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ लोकांचा बळी गेला. या दुर्घटनेत, तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं होते.
——————————————–
इरसालवाडी दुर्घटना ही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावाला 19 जुलै 2023 रोजी झालेल्या भूस्खलनाची घटना आहे. या भूस्खलनामुळे गावाची पूर्णपणे नासधूस झाली आणि 27 जण मयत झाले 57 जण बेपत्ता झाले तसेच अनेकांना आपले घर गमवावे लागले.
