नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ स्मशानभूमी ते मोहाचीवाडी रस्त्या दरम्यान स्मशानभूमी येथील पूल ते नवीन गणेश घाटा पर्यंतच्या असलेल्या रस्त्याची पडणाऱ्या अवकाळी पावसात रस्त्यावर साचलेल्या पाण्याची अवस्था झाली आहे. तर तोंडावर असलेल्या पावसाळ्यामध्ये पस्थिती ही कशा? प्रकारे असेल असा प्रश्न या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने, शासन प्रशासन या तुटपुंजी अंतर असलेल्या रस्त्याचे काम करण्याची दखल घेणार का? असा देखील सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
नेरळ स्मशान भूमी ते मोहाचीवाडी या रस्त्याचा वापर हा नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील येणाऱ्या आनंदवाडी, आंबेवाडी, कोंबलवाडी या आदिवासी वाड्यांमाधील आदिवासी बांधव व त्या भागात मोठया प्रमाणात वसलेल्या चाळींच्या वस्तीमधील व मोहाचीवाडी येथील नागरिक व शाळकरी मुले मुली मोठया प्रमानात या रस्त्याचा प्रवासाकरीता वापर करीत आहेत. तर मोहाचीवाडीतील साईमंदिर तसेच शनी मंदिर याकडे जाणारे दोन मार्ग ते धरणाच्या बाजूला बांधण्यात आलेल्या नवीन गणेश घाटा पर्यंत सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. मात्र नवीन गणेश घाट ते स्मशान भूमी येथील बांधण्यात आलेला नवीन पूल असा तुटूपूंजी अतंर असलेल्या रस्त्याचे काम न झाल्याने व आवकाळी पडलेल्या पावसात रस्त्यावर साचलेले पाणी व चिखळाची अवस्था समोर येत असल्याने मात्र तोंडावर असलेल्या पावसाळ्यात या रस्त्याची काय अवस्था होईल व कशी परस्थिती असेल? असा प्रश्न या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्या मध्ये धरणाचेवरून पाणी जात असल्याने नवीन गणेश घाट ते स्मशानभूमी या मार्गाचा सर्वांना वापर करावा लागत असल्याने, व अवकाळी पावसात या रस्त्याची ही अवस्था झाली आहे. तर तोंडावर असलेल्या पावसाळ्यात या रस्त्यावरून शाळेत जाणऱ्या शाळेतील मुलांना प्रवास करताना त्यांना किती त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. याचा विचार शासन व प्रशासनाने गरजेचे आहे. असे देखील या रस्त्यावरू प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून बोलले जात आहे. तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने, शासन प्रशासन या तुटपुंजी अंतर असलेल्या रस्त्याचे काम करण्याची दखल घेणार का? असा देखील सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.