पनवेल : माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा ९३ वा जयंती दिन व पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे नवनिर्वाचित
शिवसेना (उबाठा) महिला आघाडी जिल्हा संघटिका कल्पना पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल व पत्रकार दिनाचे औचित्यसाधून पत्रकार संजय कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव, शहर संघटिका अर्चना कुलकर्णी, मा उपनगराध्यक्ष अनिल टेमघरे, मा. नगरसेवक अच्युत मनोरे, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, महिला आघाडीच्या सुनंदा पाटील. उपशहर संघटिका उज्वला गावडे, राकेश टेमघरे, कुणाल कुरघोडे, विभाग प्रमुख अमित माळी शाखा प्रमुख भास्कर पाटील युवासेनेचे सतीश पाटील, सुरेंद्र विचारे, मयूर दसवते आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.