कामावर गेलेला इसम बेपत्ता

Haresh
पनवेल ( संजय कदम ) : राहत्या घरातून कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हरेश प्रकाश चौधरी (वय २९) रा. पळस्पे गाव, उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व दाढी वाढलेली, नाक सरळ, चेहरा उभट, डोळे काळे, अंगाने मजबूत असून अंगात पांढऱ्या रंगाचे टीशर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट पायात सॅन्डल असून त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे सोबत मोबाईल फोन व ऍक्टिव्हा स्कुटी क्रमांक एम. एच. ४६ सी.जे. ४६२३ हि आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार संतोष पिंपळे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *