पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या अपघाती, गुन्ह्यातील, बेवारस अशा 189 वाहनांच्या मुळ मालकाचा शोध घेत असून या संदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकी 123 वाहने, 4 चाकी 51 वाहने, थ्रिव्हीलर 14, अवजड वाहने 01 अशी एकूण 189 वाहने अनेक वर्षापासून पडून आहेत. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून सात दिवसाच्या आत घेवून जावेत अन्यथा पोलिसांकडून त्या वाहनाबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.
या संदर्भात संबंधित वाहन मालकांशी पत्रव्यवहार करण्यास सुरूवात केली आहे. तरी वाहन मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.