मद्याच्या बाटल्यांनी भरलेल्या टेम्पोला अपघात

मद्याच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो झाला पलटी

पनवेल ( संजय कदम ) :

  मदयाच्या बाटल्यांनी भरलेला अशोक लेलॉँड कंपनीचा टेम्पो एम एच 12 व्ही एफ 8149 खारघर येथे पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टेम्पोचे नुकसान झाले आहे.
एम एच बारा व्ही एफ 81 49 हा टेम्पो जीएम बाटल्यांचे बॉक्स भरून वसई ते पुणे येथे जात होता. सायन पनवेल हायवे पनवेलच्या दिशेने जात असताना खारघर पोलीस स्टेशनच्या समोर या टेम्पोचे टायर फुटले आणि टेम्पो विरुद्ध दिशेला पलटी होऊन अपघात झाला.
यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तर जीएमच्या अनेक बाटल्या देखील फुटल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मध्यरात्री अपघात झाल्यानंतर एक रिक्षा चालक या मद्याच्या बाटल्या चोरून नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला अटकल्यानंतर तो बाटल्या टाकून रिक्षासह पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *