पनवेल ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथून एक २० वर्षीय तरुणी कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली असून अद्याप घरी परतली नाही. त्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डिंपल राणाराम देवासी( वय २० वर्षे) असे या तरुणीचे नाव असून तिचा रंग. सावळा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे व लांब, डोळे काळे असून तिने अंगात अंगात पिवळया रंगाचा टि शर्ट, स्वेटर, काळया रंगाची जिन्स पॅन्ट घातली असून पायात सॅन्डल आहे.
या तरुणी बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार मारुती पवार यांच्याशी संपर्क साधावा