नेनेज कराओके स्टुडिओचा स्तुत्य उपक्रम – वृद्धाश्रमात संगीत मेजवानी

Ahilya mandal pen dipavali programe1
PEN न्यूज ऑनलाइन टीम |
नेनेज कराओके स्टुडिओतर्फे समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अनोखा आणि भावनिक उपक्रम राबवण्यात आला. अहिल्या मंडळाच्या ‘स्नेहांगण’ या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी खास संगीत मेजवानी व दीप संध्या चे आयोजन रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले होते.
या कार्यक्रमात स्टुडिओच्या तब्बल २५ सभासदांनी मराठी व हिंदी अशी तीन तासांची सुरेल गाणी सादर करून वृद्धाश्रमातील रहिवाशांचे मनमोकळं मनोरंजन केले. काही आजी-आजोबांनी गाण्यांच्या तालावर नाचून बालसुलभ आनंद लुटला. वातावरण आनंद, हशा आणि आठवणींनी ओथंबून गेले.
नेनेज कराओके स्टुडिओचा स्तुत्य उपक्रम – वृद्धाश्रमात संगीत मेजवानी
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रसिद्ध गायक व संगीततज्ञ संतोष पाटील यांना नुकत्याच प्राप्त झालेल्या ‘डॉक्टरेट’ सन्मानाबद्दल स्टुडिओ आणि अहिल्या मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ऍड. मंगेश नेने, संतोष पाटील, अश्विनी गाडगीळ, वासंती देव, डॉ. नीता कदम, नीलेश म्हात्रे, अभिषेक देव, राकेश पाटील आदी मान्यवरांसह गायक सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *