छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील ग्रामपंचायत शिव गणेश उत्सव मंडळ सभागृह समोर मोदी ग्राउंड येथे रविवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टी संघटन मेळाव्यात नागोठणे जिल्हा परिषद साठी सोपान जांबेकर यांची उमेदवारी जाहीर करून सदरील लढत ही धनशक्ति विरुद्ध जनशक्तिची असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले.
यावेळी मारुती देवरे, महेश ठाकूर,सोपान जांभेकर, श्रेया कुंटे, एकनाथ ठाकूर,किशोर म्हात्रे, अनंता वाघ, मोहिते,निखिल मढवी,आनंद लाड,सचिन मोदी,शेखर गोळे, सिराज पानसरे,नांगरे,अपर्णा सुटे, गणेश घाग,धनराज उमाळे, अशोक अहिरे,राजेंद्र लवटे,ज्ञानदेव शिर्के, विनोद दुबे,राजन दुबे, गौतम जैन,निमेश वाघमारे, रहूप कडवेकर, अजगर सय्यद यांच्यासह महिला व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
पंडित पाटील यांनी सांगितले की मोदी सरकारने राज्यात व देशात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या व नवीन दिशा दिल्या. आज या मेळाव्यात मी नागोठणे जिल्हा परिषद साठी सोपान जांभेकर यांची उमेदवारी म्हणून जाहीर करीत आहे. सदरील निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध .जनशक्ती अशी होणार असून आपला उमेदवार नक्कीच बहुमताने निवडून येईल तसेच 2029 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाचा खासदार निवडून पाठवायचा असून भाजपा गंगा नदी आहे.मी विकासाला चालना देण्यासाठी पक्षात आलो असुन जनतेचा विकास व्हायला पाहिजे तसेच प्रामाणिक कार्यकर्ते यांच्यावर अन्याय झाल्यास त्याची भरपाई होणे गरजेचे आहे. युतीचा फायदा तिन्ही पक्षाला व्हायला पाहिजे उद्याचा रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपाचाच होणार असल्याचे सांगून आपण सर्वांनी कामाला लागा असे शेवटी पाटील यांनी सांगितले.
सोपान जांबेकर यांनी भाजपाने काय केले हे जनतेला माहीत असुन देशात एक नंबर आहे. जिल्ह्यात आमचा कोणी वाली नाही म्हणणार्यांनी भाजपाला हलक्यात घेऊ नये. या मतदार संघात आमच्या आमदारांचे फंड वापरुनच ग्रामपंचायत मिळविली आहे. या शहरात आम्ही वाली निर्माण केले असून योजनेच्या मार्फत अनेक कामे केली आहेत. नागोठणे विभागात सुसज्ज रुग्णालय नाही विविध समस्या आहेत. आताच्या जिल्हा परिषद सदस्य कोणत्याही विभागात फिरल्याचे मला आठवत नाही. या पुढे नागोठणे विभागाची जिल्हा परिषदेची जबाबदारी आपण घेऊन शहर चांगले बनवू या असे शेवटी जांबेकर यांनी सांगितले.
श्रेया कुंटे यांनी देशाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांनी कोणताही धर्म,लोक न बघता महिला,शेतकरी,गरीब जनतेसाठी विविध योजना आणल्या.आपला पक्ष गरिबांचा असून येणार्या निवडणुकीत एकच विचार करून कमळ फुलवीला तर आपण यामध्ये यशस्वी होणार आहोत. हा कोणत्याही धर्माचा नसून गरिबांचा असून भाजपचा उमेदवार निवडून द्या आपल्या भागाचा जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे शेवटी कुंटे यांनी सांगितले.
किशोर म्हात्रे यांनी भाजपा देशात महाराष्ट्रात एक नंबर काम करते. महिला,सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना आणल्या. निवडणूक येते व जाते परंतु चांगला कार्यकर्ता हा आपल्या जवळ राहिला पाहिजे असे सांगून आपण एक दिलाने जिल्हा परिषद व पंचायत समिति उमेदवारांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवान शेवटी केले.
महेश ठाकुर यांनी आम्ही युतीमध्ये सर्वांचा तसेच त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करतो. तुमच्या नेतृत्वाला विरोध करीत नाही पण आमच्या नेतृत्वाला विरोध कराल पण त्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे शेवटी ठाकुर यांनी सांगितले.
सचिन मोदी यांनी नागोठण्यात भाजपा कार्यकर्ते पक्षाचे चांगले काम करीत आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊ या व कार्यकर्त्यांना ऊर्जा व नवीन दिशा देण्यासाठी आजचा मेळावा घेतल्याचे सांगून जिल्हा परिषद व पंचायत समितिवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी निर्धार करू एकझुट कायम करू या असे सांगितले. उपस्थितांचे आभार एकनाथ ठाकुर यांनी मानले.