किशोर भाई जैन मित्र मंडळ पुरस्कृत श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ओव्हरम क्रिकेट स्पर्धाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री कानिफनाथ संघ ठरला असून स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या वेळी किशोर जैन सतीचा माळ मैदान स्टेडीयमच्या धर्तीवर बनविणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,संतोष नागोठणेकर, माजी उपसरपंच सुनील लाड,वैभव चितळकर अल्विन नाकटी यांच्यासह विभागातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
सतीचा माळ येथील मैदानात शनिवार 10 व रविवार 11 जानेवारी रोजी झालेल्या भव्य दिव्य ओव्हरम क्रिकेट स्पर्धाच्या बक्षीस समारंभाच्या वेळी किशोर जैन यांनी आज सतीचा माळ येथील केलेले काम हे ग्रामपंचायत स्तरावर केले असून मी नुकतेच शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे कृदामंत्री हे आपलेच असल्याने सदरील मैदानचा आराखडा स्टेडियमच्या धर्तीवर बनवून मंजुरी निश्चित मिळविणार असल्याचा शब्द उपस्थित खेळाडूंना देत सदरील मैदान हे पंच्कृशीच्या खेळाडूंसाठीही कायम खुले राहणार असल्याचे शेवटी जैन यांनी सांगितले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक – कानिफनाथ संघ,मराठा आळी नागोठणे यांना रोख रक्कम व भव्य चषक, द्वितीय क्रमांक- आलिशान संघ यांना रोख रक्कम व भव्य चषक, नागोठणे , तृतीय क्रमांक – ज्वाला ग्रुप,नागोठणे यांना रोख रक्कम व भव्य चषक,चतुर्थ क्रमांक – यांना रोख रक्कम व भव्य चषक जाखमाता संघ, वेलशेत तसेच सामनावीर व मालिकावीर – कल्पेश चांदविलकर, उत्कृष्ट फलंदाज- नवाज खान व उत्कृष्ट गोलंदाज – विनीत जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.