जम्मू-काश्मीरमध्ये काल घडलेल्या घटनाक्रमानंतर रायगड जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या किंवा सद्य घटनांशी संबंधित नागरिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नागरिकांच्या मदतीसाठी खालील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत: 📞 02141-222118 / 222097 📱 8275152363 / 9763646326
तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्कासाठी पुढील क्रमांक उपलब्ध आहेत: 📞 0194-2483651 / 0194-2457543 📱 व्हॉट्सॲप क्रमांक: *7780805144, *7780938397
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, आपल्या नातेवाईकांचा संपर्क होत नसेल किंवा अडचणीत असल्यास वरील क्रमांकांचा वापर करून मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.