अर्वा चिखले प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

Arva chikhale
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
१६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या रायगड जिल्हा प्रज्ञा शोध (RTS) अंतिम परिक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा साखर, तालुका अलिबाग येथील विद्यार्थीनी कुमारी अर्वा स्मिता रविंद्र चिखले हिने ३०० पैकी २७२ गुण मिळवून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि रायगड प्रज्ञा शोध परीक्षा टिम यांच्या संयुक्त विद्यमाने सदर परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण वर्षभरात ६ सराव परीक्षा, एक पात्रता निवड परीक्षा आणि एक अंतिम परीक्षा घेण्यात आली. सदर टीमचे पदाधिकारी रत्नाकर पाटील, उमेश ठाकूर आणि दिलदार थळे तसेच इतर सदस्य यांच्या विशेष प्रयत्नांमुळे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
अर्वांने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, संतोष शेडगे, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, नितिश पाटील, तालुका शिक्षण सल्लागार समिती सदस्य नितीन पाटील, नागाव केंद्रप्रमुख प्राची ठाकूर व सर्व केंद्र प्रमुख, सधन व्यक्ती, शाळा व्यवस्थापन समिती साखर व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, शिक्षिका स्मिता चिखले, तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून तिचे कौतुक करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता कुठेच कमी नाही हे पुन्हा एकदा अर्वाने सिद्ध करून दाखवले आहे. विशेष म्हणजे अर्वाची आई स्मिता चिखले ह्या त्याच शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *