चिकन पार्टी वर्गणी वाद विकोपाला, जिवलग मित्रानेच मित्राला कायमचं संपवलं

Crime1
पनवेल (संजय कदम) : 
खारघर, बेलपाडा येथे वर्गणी न देता चिकन आणि दारूच्या पार्टीत सहभागी होणाऱ्या मन्नु शर्माला विरोध केल्याने संतप्त होऊन त्याने मित्र जयेश वाघे(23) याला हाताबुक्क्यांनी आणि क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जयेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जयेश आणि मन्नु हे मित्र असून वारंवार फुकटखोरीचा आरोप झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. जयेशने मन्नुला चापट मारल्याने संतापलेल्या मन्नुने जयेशवर हल्ला केला. पोलिसांनी आरोपी मन्नु शर्मा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *