कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील अपु-या साईडपट्टीचा रस्ता म्हणून बहुचर्चेत असणाऱ्या खांब-पालदाड मार्गावर चिल्हे धानकान्हे दरम्यान मालवाहू पीकअप टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन घसरल्याने तो जागीच पलटी झाल्याची घटना बुधवारी १३ ऑगस्ट रोजी घडली असून दैव बलवत्तर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु टेम्पोचे नुकसान झाले आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे नगर येथून कोंबड्यांचे खाद्य भरलेला टेम्पो नं.एम एच 16 CC 9553 हा टेम्पो टेम्पो चालक खांब कडून देवकान्हे मार्गाकडे जात असताना चिल्हे गावाच्या हद्दीत आला असताना व तिथून पुढे मार्गक्रमण करत असताना समोरून येणाऱ्या वाहनास पुढे जाण्यासाठी जागा देत असताना आपली गाडी रस्त्याबाजूला घेत असताना अपु-या असणा-या साईड पट्टी मुळे टेम्पो ने साईड पट्टीची जागा खचल्याने तो सोडून टेम्पो सरळ बाजूच्याच शेतात कलांडून पलटी झाला .सुदैवाने टेम्पो वाहनचालक व अन्य टेम्पो मध्ये असणाऱ्या सहप्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.तर टेम्पोमध्ये असणारे कोंबड्यांचे खाद्य चांगल्या पॅकिंग पिशव्यांमध्ये असल्याने खाद्यही सुरक्षित राहिले मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे.
या मार्गावर असणारी अपुरी साईड पट्टी व वाढलेल्या प्रचंड झाडीझुडपांमुळे रोज कुठे ना कुठे तरी छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना या घडतच असतात.तर अपुरी असणारी साईड पट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली असून व सतत वाढत जाणारी वाहतूक व प्रवासी संख्येचा विचार करता हा रस्ता पुरेसा रूंद व पुरेशा साईड पट्टीचा असणे आवश्यक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
