रोहा तालुक्यातील खांब विभागात इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा वेल्फेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मागील तीन दिवस शाळेत तिरंगा दिवस साजरा करण्यात आला तर संपूर्ण शाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान विज्ञान प्रतिकलाकृती साकारण्यात आली होती तर या शाळेचा ध्वजारोहण शाळेचे संस्थापक ॲड. रविंद्र लोखंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी हभप नारायण महाराज लोखंडे,संचालक सुधीर लोखंडे, डॉ श्याम भाऊ लोखंडे, शंकर धनावडे,दिलीप मोहिते, संतोष महाडिक, प्रदीप मरवडे, राम भालेकर, महाबळे सचिन गोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे,शिक्षिका सोनाली शिंदे,रुपाली मरवडे , प्रियांका चिकने,प्रतीक्षा धामणसे,सायली म्हात्रे, जान्हवी महाडिक, दर्शना धनवी क्रिडा शिक्षक ज्ञानेश्वर महाडिक, श्रुती वाजे,आदी विद्यार्थी शिक्षक पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
१५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर विविध गीत तसेच पथ नाट्य आणि देश स्वातंत्र्य काळात ज्या ज्या हुत्म्यानी देशासाठी बलिदान दिले अशा थोरविरांद्दलची महती पटवून दिली तसेच पालक संतोष महाडिक यांनी उत्तम असे हे मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी,हे सुमधुर आवाजात गीत गात साऱ्या उपस्थित विद्यार्थ्यांसह मने जिंकली तर विद्यार्थी कु.थिटे यांनी पियानोच्या माध्यमातून राष्ट्रगीत वाजवून विद्यार्थी वर्गाला मंत्रमुग्ध केले. संस्थेचे संचालक डॉ. श्यामभाऊ लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे, प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
लाभलेले प्रमूख पाहुणे यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की खांब सारख्या ग्रामीण भागात येथील मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी रविंद्र लोखंडे आणि सौ रिया मॅडम यांनी शाळा काढून येथील विद्यार्थी वर्गाला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत तसेच इवलेसे लावलेले रोप आणि त्याचा वेणु म्हणजेच झाडाच्या फांद्या पसरून त्याचा वटवृक्षात रूपांतर होत असल्याचा आनंद व्यक्त केला तर विज्ञानाच्या युगात शिक्षण हे महत्वाचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी केलेली भाषण तसेच विविध वेशभूषेत सादर केलेली कला त्याच बरोबर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या विविध ज्ञान विज्ञानवर साकारण्यात आलेल्या कलाकृती ध्वजारोहण प्रसंगी दिलेली परीटहिट आणि मानवंदना याचे कौतुक करत शाळेच्या कार्याची प्रशांशना केली.
संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांनी सांगितले की शाळेत शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची कला क्रीडा तसेच भारतीय संस्कृतीला आधारित नावान्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची मौलिक कामगिरी केली आहे.तर रस्यस्तरील संपन्न झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत या विद्यायातील केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान पत्र आणि चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मोठया उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी प्रथम वंदे मातरम्,राष्ट्रीय गीत, राज्य गीताने करण्यात आले.तर शेवटी लायन्स क्लब कोलाड यांच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी वर्गाला गोड खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.