मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कुंडलिका नदीच्या पुलाच्या पुढे, जुने पोलिस ठाणे कोलाडच्या नजिक शुक्रवार, दिनांक २ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.
टँकर क्र. MH 04 HS 0081 हा वाहनचालक बडेलाल रामखिलवान सिंग यांनी अतिवेगात चालवित असताना, मारुती बलेनो कार क्र. UP 16 CY 4615 हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बलेनो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेनंतर तात्काळ कोलाड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार पाटील घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी कोलाड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम २८१ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार पाटील करत आहेत.