दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन कौशिकी हॉल, दत्त नगर गेट नं. २, पेण-बोरगाव रोड येथे करण्यात आले.
या स्पर्धेत मोठ्या गटात निकिता घाग हिने प्रथम क्रमांक पटकावला. मनाली करुणा इंगळे दुसऱ्या तर चेतन पाटील तिसऱ्या क्रमांकावर आले. केतन गवळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. छोट्या गटात दुर्वा झावरे हिला प्रथम, तपस्या पाटील दुसरा आणि आराध्य पाटील तिसरा क्रमांक मिळाला. स्मंद कोठेकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. परीक्षक पसंती विशेष बक्षीस मोठ्या गटात प्रकाश पाटील व श्रुती नाईक आणि छोट्या गटात अर्णव शिंदे व विहान नाईक यांना मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण जयवंत भालेकर, देवेंद्र सरदार आणि दर्शन कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन वैभवी म्हात्रे व हरेश पाटील यांनी केलं. उद्घाटन राजन पांचाळ, सुनील पाटील, संतोष पाटील आणि परीक्षकांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या यशासाठी कौस्तुभ भिडे, शाल्मली भिडे, सुनिल पाटील, स्वप्नील साने, अजित साळवी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी धुळे, डोंबिवली, रोहा, अलिबाग, पुणे, मुंबई अशा विविध भागांतून स्पर्धकांनी सहभाग घेतला.
DAE हे OTT अॅप लवकरच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार असून, दत्त अवधुत एंटरटेनमेंट कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या कार्यात नेहमीच पुढे राहिले आहे, असे निर्माता कौस्तुभ भिडे यांनी सांगितले.