डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मधील ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाणी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला चालू वर्षात शंभर वर्षे पूर्ण होत असतानाच चवदार तळ्या पासून केवळ दीडशे मीटर अंतरावर असणाऱ्या जागेत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी परमिट रूम व बिअर बार उघडण्याचा घाट रचला असून त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने परवानगी दिल्यास आंबेडकर अनुयायांचा रस्त्यावर येईल असा इशारा कांही संघटनांनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक चवदार तळे आहे. या चवदार तळ्याला भेट देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह देश विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी येतात. तसेच २० मार्च चवदार तळे सत्याग्रहाचा स्मृति दिवस, ६ डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिन, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २५ डिसेंबर रोजी मनुस्मृतिदिन असे कार्यक्रम होतात महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यापासून केवळ दीडशे मीटर अंतरावर सिटी सर्वे नंबदरवर्षीर ८१० ब ८११ ते ८१४. या जागेतील इमारतीच्या तळमजल्यावर दुकान गाळा क्रमांक ४ ते ९ या मिळकतीमध्ये सौ. आरती सुनील अग्रवाल म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांच्या पत्नीच्या नावे परमिट रूम व बिअर बार रेस्टॉरंट हा व्यवसाय चालू करावयाचा आहे.
महाड मधील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात नव्याने परमिट रूम व बिअर बार उघडल्यास या परिसरातील नवतरुण बिघडण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून यापूर्वी नगरपरिषदेला दिलेल्या लेखी तक्रारी त स्पष्ट करण्यात आली आहे त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक व उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जोशी व राजेंद्र जोशी व स्थानिक रहिवासी संघ यांच्यासह महाड तालुक्यातील तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी याबाबत लेखी निवेदनाची तक्रार महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे दिली आहे.
प्रास्तावित इमारतीच्या तळमजल्यावर बिअर बार आणि परमिट रूम प्रस्तावित आहे या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी बिअर शॉपी देखील सुरू करण्यात आली आहे प्रास्तावित बिअर बार परमिट रूमची ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरापासून केवळ दीडशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे याबाबत या ठिकाणी परवानगी तर देऊच नये परंतु बिअर शॉपी देखील बंद करण्याची मागणी महाड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी देखील नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे सादर केली आहे
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात नव्याने उभ्या राहत असलेल्या परमिट रूम व बियरबार बाबत कोणाची हरकत असल्यास सात दिवसाच्या आत नगरपरिषद कार्यालयात लेखी सादर करावी अशा आशयाची जाहीर नोटीसद मुख्याधिकारी महानगर परिषद यांनी वृत्तपत्राद्वारे जाहीर केले आहे, मात्र महाड नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिले किंवा नाही तरी मूळ मुद्दा असा आहे की, राज्य उत्पादन शुल्क खाते यांनी या ऐतिहासिक चवदार तळे परिसरात परमिट रूम व बिअर बार ला परवानगी देऊ नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
एकंदरीत येत्या काही दिवसात महाड शहरातील ऐतिहासिक चवदार तळे परिसरातील परमिट रूम व बिअर बार ला परवानगी देण्याबाबतचा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत आंबेडकर अनुयायांचा जन आक्रोश रस्त्यावर उतरल्यास राज्य सरकारला याबाबत हस्तक्षेप करून संबंधित बियर बार व परमिट रूमला परवानगी देण्यापासून रोखणे अनिवार्य राहील.