अतिवृष्टीने कोकणाचा संपर्क तुटला; बंद रस्त्यांमुळे रुग्ण, व्यापारी आणि नागरिकांचे हाल, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अतिवृष्टीने कोकणाचा संपर्क तुटला
महाड | मिलिंद माने 
पावसाळा चालू होऊन केवळ पाच दिवस झाले मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गासहित राज्य मार्ग बंद असल्याने कोकणातून मुंबई पुण्यात जाणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला असून वैद्यकीय उपचाराभावी अनेक रुग्णांना हाल अपेष्टा भोगावे लागत आहेत मात्र बंद पडलेले रस्ते वाहतूक चालू करण्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
पावसाळा चालू होऊन केवळ पाच ते सहा दिवसाचा कालावधी लोटला मात्र पडलेल्या पर्जन्यमानामुळे राष्ट्रीय महामार्गासहित राज्य मार्ग देखील बंद असल्याने याचा फटका खेडेपाड्यातून मुंबईसाठी व पुण्याकरिता औषध उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना बसला आहे सर्व मार्ग बंद झाल्याने वैद्यकीय उपचाराभवी अनेक रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र जिल्हा ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात रस्ते चालू होण्याची वाट बघत असलेले रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
कोकणातून मुंबईसाठी जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग,पुणे जिल्ह्यात जाणारा माणगाव ताम्हणी मार्ग,महाड तालुक्यातून भोर मार्गे जाणारा महाड भोर वरंध घाट,रायगड व सातारा जिल्ह्याला जोडणारा पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाट,त्याचप्रमाणे महाड दापोली राज्य मार्गावर महाड जवळील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हॉटेल हिल्टाऊन जवळ मोठी दरड आल्याने तब्बल १२ तासाहून हा मार्गबंद आहे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ,दापोली, मंडणगडया मार्गावरून रायगड जिल्ह्यातील महाड कडे येणारी वाहतूक तसेच महाड व मुंबई,पुण्याकडे वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतअसून अनेक जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच खाजगी रुग्णालयात अनेक रुग्ण तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबई पुणे येथे जाणे गरजेचे असताना स्थानिक रुग्णालयातवेदनेने व्याकुळ होत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे.
भाजीपाला व दूध वाहतुकीवर परिणाम!
रायगड व पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरया जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड माणगाव मार्गे ताम्हणी घाट,महाड भोर वरंध घाट,तसेच पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाट,हे सर्व रस्ते बंद असल्याने त्याच बरोबर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला जाणारा रस्ता देखील नागोठण्याजवळ बंद असल्यानेभाजीपाल्या सहित दूध व फळे येत नसल्याने व्यापारी तर हतबल झालेच आहेत मात्र दूध भाजीपाला व फळांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.
प्रशासनाची हदबलता की नामुष्की!
रायगड जिल्ह्यातून मुंबई पुणे यासह पश्चिम महाराष्ट्रात जोडणारे सर्व मार्ग बंद आहेत या घटनेला तब्बल ३६ तासाहून अधिक कालावधी झालामात्र राज्य सरकारकडे एनडीआरएफचे पथक तैनात असताना देखील या मार्गावर साठलेल्या पाण्याचा निचराकरणे तसेच राष्ट्रीय व राज्य मार्गावर आलेल्या दरड हटवण्याबाबत प्रशासनाची हदबलता की नामुष्की असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसहित वैद्यकीय उपचारासाठी मुंबई पुण्याला जाणारे रुग्णांचे नातेवाईक प्रशासनाला विचारत आहेत.
रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?
रायगड जिल्ह्यातून मुंबई शहीद पुणे व पश्चिम महाराष्ट्रात जाणारे राष्ट्रीय महामार्गासहित राज्य मार्ग रस्त्यावर पाणी आल्याने व दरड आल्याने बंद असल्याने ते चालू करण्याबाबत या जिल्ह्यातीलआमदार व खासदार तसेच राज्याचे मंत्री हे रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब का विचारत नाहीत असा सवाल तासंतास या महामार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांकडून विचारला जात आहे.
गॅस पेट्रोल डिझेलचे टंचाई?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासहित रायगड वर रत्नागिरी जिल्हाला जोडणारे मार्ग पावसाच्या पाण्यामुळे व दरड आल्याने बंद आहेत मात्र या बंदरस्त्यांमुळे गॅस वाहतूक करणारे ट्रक व पेट्रोल डिझेल इंधन वाहतूक करणारे ट्रक यांची देखील वाहतूक कोंडीतून सुटका झालेली नाही परिणामी येत्या एक-दोन दिवसात या इंधन टंचाईचे व गॅस टंचाई चे परिणाम कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात पाहण्यास मिळणार आहेत.