Unseasonal Rain : नागोठणे परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

Paaus
सुकेळी ( दिनेश ठमके) :
उकाड्याने अक्षरशः हैराण झालेल्या नागरीकांना सोमवारी नागोठणे परिसरामध्ये अचानक पडलेल्या पावसाच्या हळक्या सरींमुळे वातावरणात थोड्याफार प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसुन येत होते.
दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात हीट निर्माण झाली होती. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण देखिल तयार झाले होते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस येण्याची चिन्हे दिसत असतांनाच दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास नागोठणेसह सुकेळी, वाकण, शिहु तसेच आजुबाजूच्या परिसरात पावसाच्या हळक्या सरी बरसण्यास सुरूवात झाली.
त्यामुळे अनेक दिवसांपासून उकाड्याने बेजार झालेल्या अनेकांनी या पावसाच्या सरी आपल्या अंगावर झेळत पावसात भिजून मनसोक्त आनंद लुटला. तसेच अनेक दुचाकी स्वारांनी देखिल या पावसात भिजतच दुचाकी चालवण्याचा आनंद घेतला. परंतु या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वीटभट्टी मालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *