Stock Market Crash Today : तब्बल 30 लाख कोटींचा चुराडा

Stock Market Crash
मुंबई :
एकीकडे लोकसभा निवडणुकीची मतमोजणीचे कल समोर येत असतांना शेअर बाजारावर मात्र मोठा परिमाण झाला आहे. शेअर बाजारात सुरुवातीला झालेली घसरण नंतर त्सुनामीत बदलली.
काही वेळातच सेन्सेक्स 4000 अंकांनी कोसळला होता. तर निफ्टी 1233 अंकांनी घसरला होता. 12 वाजता सेन्सेक्स तब्बल सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता.
शेअर बाजारात मंगळवारी शेअर बाजार कोसळल्यानंतर ही घसरण सुरुच आहे. शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला होता. यानंतर दुपारी 12.30 वादजता 6094 अंकांनी घसरुन 70 हजार 374 वर पोहोचला. दुसरीकडे निफ्टी 1947 अंकांनी घसरुन 21 हजार 316 वर ट्रेड करत होता.
गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी बुडाले
सोमवारी शेअर मार्केट सेन्सेक्समध्ये 2500 अंक आणि निफ्टीत 733 अंकांची वाढ होऊन बंद झालं होतं. पण आज त्याच्या दुप्पट वेगाने दोन्हीकडे घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणुकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. BSE Mcap नुसार गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी बुडाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *