Roha: नव्यानं बांधलेल्या जिल्हा मार्गाला पडले भगदाड; टेम्पो अडकला सुदैवाने जीवितहानी टळली 

Roha: नव्यानं बांधलेल्या जिल्हा मार्गाला पडले भगधाड; टेम्पो अडकला सुदैवाने जीवितहानी टळली  
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील मंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला पुगाव नम्रता ढाबा ते डोळवहळ, ऐनवहाळ, बले कांदळे, गारभट, राजखळाटी चिंचवळी तर्फे आतोने, खरबाची वाडी कडून पालीकडे जाणाऱ्या जिल्हामार्गावर भर पावसात चिंचवळी तर्फे आतोणे हद्दीत पडले भले मोठे भगदाड मालवाहू टेम्पो अडकला सुदैवाने जीवितहानी टळली तर चिंचवळी तर्फे आतोणे हद्दीतून पुढे भार्जे मार्गे पालीकडे जाणाऱ्या या मार्गाची एकाच वर्षात अक्षरशः दुरावस्था झाली आहे.
या मार्गावरील मोरी खचल्याने रस्ताच वाहून गेल्याने मोठे भगदाड मोठा पडल्याने दुर्दैवाने अपघात झाला. सुदैवाने याठिकाणी जीवितहानी झाली नसून टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.मात्र मागील दोन वर्षापूर्वी नव्याने बनवली गेलेली ही सडक नागरिकांसाठी की ठेकेदारांच्या चांगभल्यासाठी? अशी चर्चा रंगत असून या मार्गाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या १ कोटी ८५ लाखाचा निधी फुकट पाण्यात गेल्याने ग्रामस्थ नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील पुगाव नजीकच्या नम्रता ढाबा येथून पुढे चिंचवळी तर्फे आतोणे,भार्जे.मार्गे पालीकडे जाणारा हा एक नजिकचा आणि सोयीचा रस्ता आहे.त्यालाच जोडून असलेला एक रस्ता नांदगाव फाट्याकडे गेला आहे. सदर रस्ता दुर्गम भागातून गेल्यामुळे या रस्त्याला फार मोठी वर्दळ नाह.मात्र या परिसरात डोलवहाल, ऐनवहाल ते पुढे चिंचवळी तर्फे आतोणे,बल्हे,कांदळे अशी असंख्य गावे येतात. दोन तालुक्याला जोडणाऱ्या या रस्त्याची ओळख असून सुस्थितीत नसल्यामुळे गेली अनेक वर्ष रस्ता रहदारी पासून वंचित होता.
चिंचवळी तर्फे आतोणे ते भार्जे पालीकडे जाणाऱ्या रस्त्याकरिता खासदार सुनील तटकरे यांनी निधी दिला आहे.त्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झाल्याने या परिसरातील गावांना पालिकडे जाणारा मार्ग सुखकर झाला.मात्र रस्ता जागोजागी खचून जाऊन काही ठिकाणी तडे पडले आहेत तर रस्त्यावरील मोऱ्या सुद्धा खचल्या आहेत. 15 जून नंतर पावसाने आपली बॅटिंग आता जोरदार सुरू केले असल्यामुळे संततदार उचलणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची अशीच अवस्था होत राहिली तर रस्त्यावरून वाहतूक काही दिवसानंतर बंद होईल की काय? याची भीती मात्र येथील नागरिकांना पडली आहे.
परंतु ठेकेदारांनी रस्त्याला अक्षरशः चुना लावल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.त्यामुळे एकाच वर्षात बांधण्यात आलेल्या मोऱ्या देखील खचल्या आहेत.रस्ता पूर्ण खराब झाला आहे.शासनाने दरी खोऱ्यातल्या वस्ती करीता कोट्यावधी निधी देऊन सुद्धा तो निधी फुकट गेला आहे.त्यामुळे सबंधित खात्याने सदर ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संजय मोते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *